संगमेश्वर/दिनेश आंब्रे – संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे गावचे ग्रामदैवत देवी श्री महालक्ष्मी व जखमाता व पावणादेवी चा शिमगोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जात आहे. गाव प्रमुख श्री. पांडुरंग मोतीराम पानगले यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक पद्धतीने या सणाचे कार्यक्रम सपन्न होत आहेत.
दिनांक 22 मार्च पासून रात्रौ दहा वाजता देवी चे रूपे लावली जातात त्या नंतर दुसऱ्या दिवसा पहाटे चार वाजता माड आणण्यात आला. तसेच दुपारी दोन वाजता शिमगा साजरा केला जातो. आई चे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यासह परजिल्हा तसेच परराज्यातूनही आईचे भक्त दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. सायंकाळी पाच वाजता माड उभा करण्यात येतो व होम करण्यात येतो.
ही भक्तमंडळी माड हातात घेऊन नाचण्याचा सुखद आंनद घेतात परंपरेची पालखी दी.24 मार्च पासून (जांभूळवाडी )येथे प्रत्येकाच्या घरी भक्तग्णांच्या भेटी साठी जाणार त्यावेळी महिला भक्तगन ओट्या भरून नवस फेडतात व गाऱ्हानेही मंडतात भक्तांची इच्छा पूर्ण करणारी आई महालक्षमी व पावणादेवी तिच्या शक्तीचे अनन्यसाधारण महत्व संगमेश्वर तालुक्यात मानले जाते.
भक्तांच्या नवसाला पावणारी या देवीचे शिंपणे दी 27 मार्च रोजी गावादेवळी सहानेवर शिंपणोत्सव सर्वगावकरी मंडळीच्या उपस्थित साजरा केला जाणार आहे.