मत्स्यगंधासह नेत्रावती एक्स्प्रेस पनवेल स्थानकातून सुटणार

Spread the love

रत्नागिरी :- मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नादुरूस्त झालेल्या पिट लाईन दुरूस्तीसह देखभालीचे काम १३ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे . या कामांमुळे ३५ दिवस लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळूर मत्स्यगंधा एक्स्प्रेस व लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस पनवेल स्थानकातून सध्याच्याच वेळेनुसार चालवण्यात येणार आहेत .
नियमितपणे धावणाऱ्या १६३४६ क्रमांकाच्या तिरूअनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेस व १२६२० क्रमांकाच्या मंगळूर- लोकमान्य टिळक मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा प्रवास १८ मार्चपर्यंत पनवेल स्थानकात समाप्त होईल . १६३४५ क्र.ची लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस , १२६१९ क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळूर मत्स्यगंधा एक्स्प्रेस १३ फेब्रुवारी ते १९ मार्चपर्यंत पनवेल स्थानकातून सुटणार आहे . या दोन्ही एक्स्प्रेस सध्याच्या वेळेनुसार सुटणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले . नेत्रावती एक्स्प्रेस दुपारी १२.१५ वा . पनवेल स्थानकातून तर मत्स्यगंधा एक्स्प्रेस सायं . ४.२५ वा . पनवेल स्थानकातून सुटणार आहे . यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळ गाठण्यासाठी विलंबाच्या प्रवासाला समोर जावे लागणार आहे .

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page