ठाणे /मुरबाड /प्रतिनिधी/ लक्ष्मण पवार- मुरबाड मधील ग्रामीण भागात गावठी हातभट्टी दारू उध्वस्त करण्याचा संकल्प मुरबाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी घेतला असून मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावातील जंगलामध्ये जाऊन मुरबाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या नेतृत्वाखाली एक गावठी हातभट्टी दारू उध्वस्त केली आहे.याकामी पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर, psi पवार, Asi जूनरे, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक देवरे, चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल कंते यांनी कोरावळे गावाच्या पूर्वेकडील जंगलात जाऊन एका गावठी हातभट्टीत दारूवर धाड टाकून मुद्देमालास जप्त करून तसेच गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करण्याचे काम या टीमने केले आहे.
कोरावळे गावच्या जंगलात टाकलेल्या धाडीमध्ये गावठी हातभट्टी दारू जवळपास २०० लिटर मापाचे १५ प्लास्टिक ड्रम त्यात ३००० हजार लिटर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची वॉश रसायन तसेच लोखंडी ड्रम१०० लिटर मापाचा, जर्मन धातूचे सतेले तसेच इतर गावठी हातभट्टी दारू करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदर जप्त करण्यात आलेली ३००० लिटर दारूची किंमत अंदाजे १लाख २०हजार आहे.आरोपीचा मुरबाड पोलीस शोध घेत आहेत.