मुंबई : गोवंडी एम (पूर्व) महानगरपालिका हद्दीत रस्त्याच्या बाजूलाच असणाऱ्या बोरबादेवी उद्यानाकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिक प्रशासनावर नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या उद्यानाची नीट देखभाल केली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.बोरबादेवी उद्यानात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे उद्यानात खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांनी व विरंगुळा साठी येणाऱ्या जेष्ट नागरिकांनी सांगितले.
२६ डिसेंबर २०१६ रोजी सौ. स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते सदर उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले परंतु आज ७ ते ८ वर्षे उलटून गेली तरी अजूनही त्याच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नाही.जुन्या , तुटलेल्या व खराब झालेल्या खेळण्याचे साहित्य गेली कित्येक वर्षे तसेच आहे.
तुटलेल्या खेळण्यामुळे आज कित्येक लहान मुले खेळत असताना त्यांच्या पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो.रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारची विजेची सोय नाही , प्रसाधनगृह तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नसलेले गोवंडी विभागातील महानगरपालिकेचे एकमेव दुर्लक्षित उद्यान आहे.