रिफायनरी प्रकल्प पुर्णता रद्द हिच पत्रकार शशिकांत वारिसे यांना खरी श्रद्धांजली
राजापूर (प्रतिनिधी) कोकणातील रिफायनरी विरोधात सतत वर्तमानपत्रात लिहिणारे पत्रकार कै.शशिकांत वारीशे यांच्या निर्घृण हत्या विरोधात प्रक्षोभ मोर्चा कुणबी राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष श्री. अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली निघालेला प्रचंड मोर्चा पोलिसांनी लावलेल्या सर्व बंधनाना न जुमानता राजापूर तहसिलदार कार्यालयावर धडकला.
या आंदोलनात श्री. अशोक वालम साहेबांनी दोन पत्रकारांना जीवंत मारून हत्या करणार्यांना व पडद्यामागे मदत करणाऱ्या सर्व समाजकंटक हे राजकीय पाठिंब्याचा आधार घेवून कोकणात गुन्हेगारी करतात त्यांचा ताबडतोब शोध घेवून SIT च्या माध्यमातून तपास झाला पाहिजे अशी मागणी केली.
या आंदोलनाचा धसका एवढा मोठा होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब SIT मार्फत खुनाची चौकशी होणार अशी घोषणा केली.एवढेच नव्हे तर हा खटला फास्टट्रॅक वर चालवून ६ महिन्यात निकालात काढू असेही सांगितले.
जर ह्या खुनशी समंधित इतरही अपराध्यांना लवकरच पकडण्यात आले नाही तर श्री.अशोक वालम साहेब आंदोलनाची दिशाच बदलणार आहेत.त्या आंदोलनाच्या तीव्रतेने सरकार अडचणीत सापडणार आहे. मुंबई सह कोकणात याचे पडसाद उमटल्या शिवाय रहाणार नाहीत.
या प्रक्षोभ मोर्चा आंदोलनात कुणबी राजकीय संघटन समितीचे सरचिटणीस श्री. नंदकुमार मोहिते, लांजा ग्रामीण शाखेचे सचिव श्री. वसंत घडशी, कुणबी नेते श्री.सुरेश भाईजे,म्हसळा, मंडणगड व रत्नागिरी शाखेचे अनेक नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आता थांबायचे नाही
रिफायनरी होऊच द्यायची नाही,अन्यथा सरकारच्या पाठिंब्याने त्या पंढरी आंबेरकर सारखे इतरही दलाल आणखी कोकणी माणसांचे खून पाडतील.म्हणून कोकणात ऑइल रिफायनरी पेट्रो केमिकल हा महाभयंकर प्रदूषणकारी प्रकल्प नको, हा एकच पर्याय आहे. अन्यथा ह्या सगळ्यापासून कोकण वाचवायचे असल्यास जिवण मरणाची अंतिम लढाई सुरु करावी लागेल असा ठाम निर्धार श्री. अशोक वालम यांनी व्यक्त केला.