देवरुख:- आज कोसुंब जिल्हा परिषद गटातील घोडवली गावातील शिवसेना (उबाठा गट) कार्यकर्त्यानी भाजप मध्ये प्रवेश केला.
या साठी विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री प्रमोद अधटराव; तालुका अध्यक्ष रुपेश कदम; ओबीसी जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये यांच्या सहकार्याने मनिष सावंत यानी विशेष प्रयत्न केले.
आज घोडवली गावच्या सरपंच सौ. वैदेही वैभव बने यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य सौ. मीना भालचंद्र बने, ग्रामपंचायत सदस्य श्री रवींद्र भेरे (शिवसेना शाखा प्रमुख ), सौ. नैना बने जाधव, श्री वैभव बने, भालचंद्र बने, अरविंद बडद, राजाराम बने, परशुराम घडशी (गावकर ), प्रताप बने, प्रकाश कदम, बाळाराम भेरे, दिलीप गुरव, श्रीपत भेरे, अपर्णा बडद, रुपाली कदम, पल्लवी बने, सुभाष भेरे, राजाराम गुरव, उमेश दळवी, कल्याणी घडशी, मयुरी भेरे, सत्यवती घडशी, शालिनी भेरे, आर्या आग्रे, प्रमोद मेस्त्री, संतोष मेस्त्री, प्राजक्ता घडशी, सीताराम शिंदे आदी 50 ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला
भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री राजेश सावंत, विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री प्रमोद अधटराव, दक्षिण संगमेश्वर तालुका अध्यक्ष श्री रुपेश कदम यांच्या नेतृत्वात हा जाहीर पक्ष प्रवेश झाला.
यासाठी भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री मनिष सावंत यांनी विशेष प्रयत्न केले…
या प्रसंगी जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री अभिजित शेट्ये,भाजपा जेष्ठ कार्यकर्ते श्री मुकुंद जोशी, जिल्हा सरचिटणीस सौ.संगीता जाधव,उत्तरं संगमेश्वर मंडळ अध्यक्ष श्री विनोद म्हस्के, जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री सुधीर यशवंतराव, महिला मंडळ अध्यक्ष सौ.स्नेहा राहुल फाटक, युवा मोर्चा चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख अविनाश गुरव,तालुका सरचिटणीस श्री सचिन बांडागळे, सोशल मीडिया संयोजक अमोल गायकर, प्रमोद शिंदे, संदीप वेळवणकर, अनिकेत मोहिते, राजू महाडिक, संदीप कारेकर, अमित रेवाळे, पांढरीनाथ मोहिरे, तुकाराम किर्वे, नामदेवबने, पुष्कर शेट्ये, शुभम पांचाळ इत्यादी अनेक भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.