कानपूर- उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात राहणाऱ्या साक्षी गर्गने कमी वयात जे स्थान मिळवले आहे, त्यासाठी लोकांना अनेक वर्षे वाट पाहावी लागते. २०१८ मध्ये UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर साक्षी गर्गचे नाव सर्वांच्या ओठावर होते. साक्षीच्या वडिलांना नागरी सेवेत रुजू व्हायचे होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. पण नंतर त्यांच्या मुलीने हे स्वप्न पूर्ण केले.
IRS साक्षी गर्ग या उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील रॉबर्टसगंज येथील रहिवासी आहेत. तिथून UPSC परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या त्या पहिल्याच उमेदवार आहेत. साक्षी यांचे वडील कृष्ण कुमार गर्ग हे व्यवसायाने व्यापारी आहेत आणि आई रेणू गर्ग या गृहिणी आहेत. साक्षी गर्ग सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असून त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे स्थान मिळवले आहे. सरकारी नोकरीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या साक्षी गर्ग यांनी २०१० साली दहावीच्या परीक्षेत ७६.१ टक्के गुण मिळवले होते. साक्षी यांनी प्रकाश जीनियस इंटर कॉलेजमधून बारावीची परीक्षा दिली. त्यात त्यांना ८१.४० टक्के गुण मिळाले. त्यानंतर कला शाखेतील पदवी परीक्षेत ६१ टक्के गुण मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या.
आयआरएस साक्षी गर्ग यांनी दिल्लीतून यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती. जेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना आयएएस (आयएएस परीक्षा) होण्याचे स्वप्न सांगितले तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला पूर्ण पाठिंबा दिला. वास्तविक त्यांचे वडील कृष्ण कुमार गर्ग यांना स्वतः नागरी सेवेत रुजू व्हायचे होते पण काही कारणांमुळे ते त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही.
यूपीएससीच्या मुलाखतीत त्यांना हिंदू-मुस्लिम सणांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांचे उत्तर ऐकून मुलाखती पॅनेलमध्ये उपस्थित जज चांगलेच प्रभावित झाले. साक्षी गर्गने UPSC परीक्षेत इतिहास हा पर्यायी विषय म्हणून निवडला होता. साक्षी यांना पुन्हा तयारी करायची आहे आणि यूपीएससी परीक्षेत बसून आयएएस अधिकारी बनायचे आहे. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत आयआरएस रँक मिळवली. त्यांचा हा प्रवास यूपीएससी उमदेवारांना नक्कीच प्रेरणादायी आहे.