रत्नागिरी:- जयगड मधील J. S. W च्या नविन जेटीसाठी किल्ले जयगड च्या बुरुजांच्या शेजारी ड्रेजिंग काम जोरात सुरू आहे,आणि त्यांच्या तीव्रतेने किल्ला च्या बुरुजांना तडे गेलेच वृत्त दोन दिवस वृत्तपत्र च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र समोर आले आहे. त्याची च दखल घेऊन रत्नागिरी तहसीलदार यांना ताबडतोब किल्याची पाहणी केली होती. आणि लगेचच आज सायंकाळी पर्यंत तसा पंचनामा सहित अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिले होते, त्याप्रमाणे आज संपूर्ण टीम, ग्रामस्थ,आणि पुरातत्व विभागाचे कर्मचारी समवेत घटनास्थळी जाऊन किल्याचा बुरुजांची पाहणी केली आणि तसा पंचनामा करून जिल्हाधिकारी याकडे सादर केला आहे.
पाहणी केलेल्या पंचयादी मध्ये असा उल्लेख आहे. की, किल्याच्या २०० ते २५० मीटर अंतरावर यंत्राच्या सहाय्याने खाडीकडे ड्रेजिंग चे काम मागील सहा महिने रात्र-दिवस सुरू असल्याचे बुरुजाला तडे गेलेले आहेत.या आधी महणजे सहा महिन्यांपूर्वी अश्या प्रकारचे तडे नव्हते, ते आत्ताच हे काम सुरू झाल्यावर बुरुजांना तडे गेले आहेत,असे किल्याची देखभाल करणारे कर्मचारी यांनी पाहणी साठी गेलेल्या अधिकारी आणि ग्रामस्थांच्या समक्ष पंचयादी करताना स्पष्ट केले आहे.आणि म्हणूंन मागील सहा महिन्यात तडे गेल्याचे या अहवालात ( पंचयादी) निष्पन्न झाले आहे.
त्याचप्रमाणे किल्याच्या पूर्व बाजूस खडीकडे अनधिकृत उत्खनन करून जो भराव टाकून बांधकाम केले असल्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून भरती ओहोटी च्या लाटांमुळे तटबंदी आणि बुरुज ढासळत असल्याने ही वस्तुस्थिती ची पाहणी करुन ती खरी आहे असे सुद्धा या पंचयादी मध्ये म्हटले आहे.अशीच परिस्थिती कायम राहिली तर जयगड किल्याचे अस्थित्व धोक्यात येऊन, किल्ला संपुष्टात येऊ शकतो. म्हणून दिवसरात्र ड्रेजिंग काम कंपनीने तत्काळ बंद करावे, असे ही या पंचयादी मध्ये म्हटले आहे.आणि याकडे शासनाच्या पुरातत्त्व विभागने लक्ष घालून झालेल्या बुरुजांच्या नुकसणीबाबत दुरुस्ती होईपर्यंत काम बंद करावे असेही यात म्हटले आहे.
समनधित विषयायची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हाधिकारी आणि पुरातत्त्व विभाग कोणती कार्यवाही करतील या कडे संपूर्ण महाराष्ट्रचे लक्ष आहे.
किल्याच्या बुरुजांना तडे झाडांच्या मुळा ने गेले नसुन, ते कंपनीच्या चालु असलेल्या ड्रेजिंग मुळे झालेच मान्य करीत, मी JSW ला नोटीस देणार आहे :- राज दिवेकर -पुरातत्व विभाग
या सर्व विषयी जिल्हाधिकारी, पुरातत्व विभाग तसेच आज वर न बोलणारे लोकप्रतिनिधी योग्य ती कार्यवाही करतील अशी आशा आहे :- जयगड ग्रामस्थ, दुर्ग प्रेमी