खेड- संत रोहिदास समाजसेवा संघ खेड शहर शाखेच्यावतीने संत रोहिदास नगर येथे आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत श्रुतिका खेडेकर हिने तसेच संगीतखुर्ची स्पर्धेतील लहान व मोठ्या गटात अनुक्रमे ऋतू कासार, हर्ष पासवान यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
तन्वी व श्रावणी खेडेकर ग्रुपने द्वितीय तर भक्ती खेडेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शीतल देवळेकर, अजय निगडेकर, पाताडे यांनी काम पाहिले. संगीतखुर्ची स्पर्धेतील लहान गटात निधी खेडेकर, हर्ष बुधकर तर मोठ्या गटात यश खेडेकर, संदेश देवळेकर यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केला. या वेळी हरी देवळेकर, हर्षदा देवळेकर, सुधीर देवळेकर, सावर्डेकर, साईनाथ खेडेकर यांनी बहारदार गीतगायनाने उपस्थितांची मने जिंकली.