
कल्याण – गोळीबाराच्या घटनेनंतर शनिवारी रात्री व्दारली गावातील एका महिलेने भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विरुद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने तक्रार केली. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून आमदार गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
मधुमती उर्फ निता एकनाथ जाधव या तक्रारदार आहेत. त्या कुटुंबीयांसह व्दारली गावात राहतात.
या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांच्यासह विकासक संस्थेचे भागीदार जितेंद्र पारीख, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकांत ओल, मंगेश बारघेट यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.


