जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या चौथ्या टप्प्यात ८६७ जणांच्या बदल्या
मुंबई : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या चौथ्या टप्प्यात ८६७ जणांच्या बदल्या झाल्या आहेत.यामध्ये विकल्प भरताना पहिल्या क्रमांकावरील शाळेत बदली मिळालेले ४८४ शिक्षक असून एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ५६ टक्के आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरवातीला धिम्या गतीने सुरू होती; मात्र ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत संवर्ग एक ते चारच्या बदल्यांची प्रक्रिया वेगाने झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी चौथ्या संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर झाली आहे. संवर्ग ४ मध्ये म्हणजे बदलीप्राप्त शिक्षकांची यादी निश्चित करण्यात आली होती. त्यामध्ये ८७८ शिक्षकांचा समावेश होता. सर्वच शिक्षकांनी बदलीसाठी शाळा विकल्प भरल्यामुळे कुणाला कोणती शाळा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एकूण यादीपैकी ८६७ शिक्षकांच्या बदल्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ११ शिक्षकांना विकल्प भरूनही शाळा मिळालेली नाही. ते विस्थापित राहिल्यामुळे पुढील टप्प्यासाठी त्यांना ऑनलाईन माहिती भरावी लागणार आहे. विस्थापितांसाठी रँडम राऊंड ठेवण्यात आला आहे. त्यामध्येही संधी मिळाली नाही तर शिक्षण विभाग देईल त्या शाळेवर शिक्षकांची नियुक्ती केली जाऊ शकते
जाहिरात :