बुधवारी पहाटे रत्नागिरी शहरानजिकच्या शेट्येनगर येथील चाळीत झालेल्या गॅस स्फोटात गंभीर भाजलेल्या घरमालक अशफाक काझी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यांच्यावर कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.
बुधवारी पहाटे लिकेज झालेल्या गॅसच्या स्फोटामुळे चाळीचा स्लॅब उडाला होता तर कोसळलेल्या स्लॅबखाली सापडून अशफाक काझी यांची पत्नी कनिज काझी, सासू नुरूनिस्सा अलजी यांचा मृत्यू झाला होता. तर, वडील- मुलगा गंभीर जखमी झाले होते. अशफाक काझी गंभीर भाजल्याने त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
जनशक्तीचा दबाव न्यूज च्या व्हॉट्सॲप ग्रुपला जाॅईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…!
https://chat.whatsapp.com/HQiAsuMSyI7Hm80N8mGcP7