‘मेक इन इंडिया’ला चालना; टाटा समूह बनवणार हेलिकॉप्टर…

Spread the love

टाटा समुहाने विमान आणि हेलीकॉप्टर निर्मिती कंपनी एअरबससोबत महत्त्वाचा करार केला आहे. या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ला चालना मिळणार आहे. फ्रान्सची जेट निर्माती कंपनी एअरबस टाटा समूहासोबत देशातील हेलिकॉप्टरसाठी अंतिम असेंब्ली लाइन सेट करण्यासाठी भागीदारी करत असल्याचं एअरबस हेलिकॉप्टर्सने जाहीर केलं आहे. हा करार देशात सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आणि इतर विमानांच्या निर्मितीसाठी आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतात उपस्थित होते. मॅक्रॉन यांच्या या भेटीत भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण औद्योगिक भागीदारी ‘रोडमॅप’वर सहमती झाली आहे.

टाटा कंपनी आता एअरबस कंपनीसोबत मिळून हेलिकॉप्टर्स निर्मिती करणार आहे. FAL भारतासाठी त्यांच्या नागरी श्रेणीतून एअरबसचे सर्वाधिक विकले जाणारे H125 हेलिकॉप्टर तयार करेल. त्यामुळे आता एअरबस हेलिकॉप्टर्स मेड इन इंडिया असतील. इतकंच नाही तर टाटा समूह हे हेलिकॉप्टर्स शेजारील देशांमध्ये निर्यातदेखील करणार आहे. भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमासाठी हे एक मोठं पाऊल आहे.

या करारांतर्गत, गुजरातमधील वडोदरा येथे अंतिम असेंब्ली लाइन तयार केली जाईल, जिथे टाटा समूह आणि एअरबस संयुक्तपणे एअरबसचे H125 सिंगल इंजिन हेलिकॉप्टर तयार करतील. हैदराबादमधील एअरबसच्या मुख्य घटक असेंब्ली लाईनवर विमानाचे भाग तयार केले जातील. ३६ एकरांवर असेंबली लाईन बांधली जाणार आहे. २०२४ वर्षाच्या मध्यापर्यंत असेंबली लाईन तयार होईल आणि नोव्हेंबर २०२४ पासून तेथे कामाला सुरुवात होईल. तेथून हेलिकॉप्टरचे भाग तयार करून वडोदराला पाठवले जातील. वडोदराच्या असेंब्ली लाईनमधील पार्ट्स जोडून हेलिकॉप्टर बनवलं जाईल. करारानुसार, वडोदरा-आधारित असेंब्ली लाइनमध्ये किमान ४० C295 वाहतूक विमाने देखील तयार केली जातील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page