नेरळ: सुमित क्षीरसागर – राम मंदिर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर निघालेली मिरवणुकीत नेरळ गावात भगवा झेंडा लावण्यावरून वाद निर्माण होता.तर कळंब सालोख येथे तरुणाने समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल केल्याने जमाव जमल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.दरम्यान,नेरळ पोलीस ठाण्याकडून या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी कडक भूमिका घेवून दंगा भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली असून पोलिसांच्या कठोर भूमिकेने शांतता प्रस्थापित झाली आहे.
अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा झाल्याने नेरळ येथे व्यापारी फेडरेशन आणि नेरळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी विजयी मिरवणूक आयोजित केली होती.या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जामा मस्जिद समोरील रौफ खोत यांच्या दुकानाच्या छताच्या पाईपला झेंडा लावण्यात येत होता.त्यावेळी पोशीर गावातील एका हिंदू तरुणाने स्वतःची व्हिडीओ तयार करून त्या व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल केली.त्या पोस्ट मध्ये काही आक्षेपार्ह शब्द असल्याने त्या बद्दल जामा मुस्लिम मशीद विश्वस्त यांच्याकडून नेरळ पोलीस ठाणे येथे तक्रार करून गुन्हा दाखल करण्यात मागणी केली होती.त्यावेळी त्या व्हायरल पोस्ट मधील वादग्रस्त शब्द टाकून इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ प्रसारीत करून मुस्लीम समाज्याच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून गुन्ह्याची नोंद करण्यात आली.त्या गुन्ह्यातील हिंदू तरुणाला भादवी कलम 295 नुसार गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
25 जानेवारी रोजी कर्जत तालुक्यातील कळंब येथील सालोख गावातील मुस्लिम तरुण अरमान शेख धर्मीय तरुणाने इंस्टाग्राम अकाउंटवरून मीरा भाईदर येथील वादग्रस्त पोस्ट समाज मध्यमांवर व्हायरल केली होती.अयोध्या मध्ये श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापनेच्या नंतर काही वादग्रस्त व्हिडिओ घेवून वादग्रस्त शब्द असली पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारीत करून हिंदू समाजाच्या धार्मीकभावना दुखावल्या बद्दल जमाव रात्री कळंब येथे जमला.हा जमाव प्रचंड संख्येने असल्याने नेरळ पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी शेवटी लाठीचार्ज देखील करावा लागला.त्यावेळी कळंब गावाचे पोलीस पाटील यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दखल करून पहाटे अडीच वाजता साळोख गावातील मुस्लिम तरुणाला ताब्यात घेतले.पोलीस उप अधीक्षक विजय लगारे आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले.त्यब्बदल देखील नेरळ पोलीस ठाणे येथे भादवी कलम 295 नुसार गुन्हा दाखल करून कारवाई केली.त्या मुस्लिम तरुणाला देखील अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून दोन्ही प्रकरणात स्थानिक पातळीवर शांतता आहे.