वाऱ्याच्या वेगाने आली, सर्वांना धडाधड उडवत गेली; भररस्त्यात मृत्यूचा थरार…

Spread the love

ओडिशा : ओडिशात एका भीषण रस्ता अपघातात सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना शुक्रवारी (26 जानेवारी) घडली. पीटीआयच्या वृत्तानुसार, एका वेगवान एसयूव्हीने दोन मोटारसायकलसह ऑटोरिक्षाला धडक दिली.या अपघाताचा व्हिडीओही समोर आला आहे.

ही घटना ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या एसयूव्हीमुळे हा अपघात झाला. सिंगल लेन रोडवर हा अपघात झाल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. एक SUV भरधाव वेगाने येताना दिसत आहे. ऑटोरिक्षाला ओव्हरटेक करण्यासाठी एसयूव्ही पुढे सरकली असता रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांनी एसयूव्हीला धडक दिली. त्याचवेळी ऑटोचाही अपघात झाला. या धडकेनंतर एसयूव्ही आणि ऑटो रिक्षा रस्त्यालगतच्या शेतात पडली. तिन्ही वाहनांतून प्रवास करणारे लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले. हे दिसताच स्थानिक लोकांनी तातडीने घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले.

पोलिसांनी सांगितले की, अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या इतर लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आणखी किती जण जखमी झाले आहेत, याची माहिती मिळालेली नाही.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी शोक व्यक्त केला आणि आर्थिक मदत जाहीर केली.

तामिळनाडूत भीषण अपघात

दोन दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या थोप्पूरमध्येही असाच भयंकर अपघात झाला आहे. एका ट्रकने एका डम्परला धडक दिली. त्यानंतर त्या डम्परने दुसऱ्या डम्परला आणि कारला उडवलं आहे. हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

तामिळनाडूत 4 गाड्यांचा भीषण अपघात…

अचानक मागून येणारा एक ट्रक पुढच्या डम्परला धडकतो. त्यामुळे डम्परचा मार्ग बदलतो तो थेट दुसऱ्या बाजूच्या डम्परला धडकतो. तो डम्पर पुढे निघून जातो आणि ट्रकची धडक बसलेला डम्पर पुन्हा मार्ग बदलून आणि फ्लायओव्हरच्या मध्ये असलेल्या जागेतून खाली कोसळताना दिसतो. त्यावेळी तो त्याच्या मार्गात एक कार येते, ही कारही त्या डम्परच्या खाली चिरडून डम्परसह फ्लायओव्हरवरून कोसळते. ज्या एका ट्रकमुळे हा असा अपघात झाला, तो ट्रक तिथं थांबतो पण पेट घेतो.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page