अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट…
संगमेश्वर प्रतिनिधी- अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी संगमेश्वर येथील समाजबांधवांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊन संतप्त झालेले नागरिक पोलीस स्थानकावर धडकले.संगमेश्वर मधील समाजकंटकाला संगमेश्वर पोलिसांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात जनतेसमोर आणून माफी मागायला लावल्यानंतर जमाव शांत झाला. तसेच आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी जनतेला दिले.
सोमवारी अयोध्येत श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी शोभायात्रासह जल्लोष साजरा करण्यात आला मात्र याच दिवशी इंस्टाग्राम वर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली याचा बुधवारी अखेर उद्रेक झाला ही पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा व त्यांना सर्वांसमोर माफी मागायला हवा अशी संतप्त जनतेने मागणी केली. संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये प्रमोद अधटराव, अभिजित शेट्ये ,अभि सप्रे, मिथुन निकम,राकेश जाधव,कोमल रहाटे, माधवी भिडे, विनोद म्हस्के, अमित ताठरे, दिपक चाळके, शीतल दिंडे, गौरव सुर्वे, मुरलीधर चाळके, मयूर निकम, अनुप प्रसादे, अविनाश गुरव आदीसह अनेक जण जमा झाले होते. त्यांनी समाजकंटकावर गुन्हा दाखल तसेच कारवाई करण्याची मागणी केली तसेच समाजकंटकाला माफी मागण्यास सांगितले. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे पोलीस सचिन कामेरकर किशोर जोयशी आदी पोलिसांनी समय सूचकता दाखवत समाजकंटकावर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आश्वासन दिले तसेच जनतेने पोलिसांना सहकार्य करण्याचे सांगितले त्यानंतर जमाव शांत झाला.
जनतेसमोर समाजकंटकाची माफी आक्षेपार्ह पोस्ट टाकून तणाव निर्माण करणाऱ्या समाजकंटकाला संगमेश्वर पोलिसांनी जनतेसमोर उभे केले त्याने दोन्ही हात जोडत आपण चुकी केल्याचे मान्य केले तसेच माफी मागितले . तसेच हजर न झालेल्या समाज कंटकाला हजर करून घेऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.