ठाणे: निलेश घाग नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी आणि त्यांनी त्या नियमांचे कटाक्षाने पालन करावे या हेतूने दरवर्षी सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक पोलीसांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे महत्व पटवून देण्यात येते. यंदाही ठाणे वाहतूक पोलीस विभागातर्फे सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान – २०२४ राबविण्यात येत आहे.
याच जनजागृती उपक्रमाचे पुढचे पाऊल म्हणून ठाणे वाहतूक पोलीस विभागातर्फे रील मेकिंग, फोटोग्राफी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे ठाणे वाहतूक विभाग आणि वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
जाहिरात