अलीकडेच नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक विधाने केली. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजल्याचे पाहायला मिळाले.
‘काँग्रेस स्वबळावर लढणार’, नाना पटोलेंच्या या व्यक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की काँग्रेस जर स्वबळावर लढायला तयार असेल, तर त्यांचं अभिनंदन! मात्र जनता ठरवलेच की २०२४ मध्ये सत्तेवर कोण येणार.
नाशिक, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि त्यातही विशेष म्हणजे काँग्रेसची अवस्था खूपच वाईट झाली आहे, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तसेच काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस अधिकाधिक वाईट होत असून, पुढच्या विधानसभेत त्यांना उमेदवार देखील मिळणार नाही, असेही बावनकुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
काय म्हणाले होते नाना पटोले?
नुकतीच काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. ‘भारत जोडो यात्रेमुळे राज्यातील वातावरण बदलले आहे. लोक काँग्रेसची वाट पहात आहेत आणि काँग्रेस लवकरच स्वबळाने सत्तेवर येईल,’ असे यावेळी नाना पटोले म्हणाले.