दिवा : वार्ताहर (देवराज रावल) श्रीराम मंदिर, अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीकांत शिंदे आयोजित अयोध्या श्रीराम मंदिर रथाच्या प्रतिकृतीची उभारणी करण्यात आली होती. बुधवारी डोंबिवलीतून या भव्य रथाची मिरवणूक मोठ्या रामनामाचा जय घोषात निघाली. शुक्रवारी सायंकाळी दिवा शहरातील साबेगाव येथील विठ्ठल मंदिरापासून सुरू झालेल्या रथयात्राची मिरवणुक दिवा शहरात काढण्यात आली.
व्हिडिओ पहा सविस्तर.
यावेळी शिवसेनेचे उपमहापौर श्री.रमाकांत मढवीजी यांच्या हस्ते श्री.प्रभू श्रीराम रथाचे पूजन करण्यात आले,तसेच गुलालाची उधळण करीत जय श्री.रामच्या घोषणांनी दिव्यातील मुंब्रा देवी कॉलोनी परिसर भक्तिमय झाला. यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख शैलेश पाटील, ॲड.आदेश भगत, विभाग प्रमुख श्री.निलेश पाटील सौ.अर्चना पाटील, श्री.दीपक जाधव, सुनिता गणेश मुंडे, श्री.अमर पाटील, सौ.दिपाली उमेश भगत, सौ.दर्शना श्री.चरणदास म्हात्रे, श्री.चरणदास म्हात्रे, शशीकांत पाटील, भालचंद्र भगत, विनोद मढवी, युवा अधिकारी जय कु.साक्षी मढवी, जगदीश भंडारी यांच्यासह पदाधिकारी व मोठ्या संख्येने रामभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात