
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेचे दुरूस्तीचे काम सुरू
ठाणे : निलेश घाग ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते कल्याण फाटा येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेतल्यामुळे गुरूवार दिनांक 18/01/2024 रात्री 12.00 ते शुक्रवार दिनांक 19/01/2024 रात्री 12.00 वा. पर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगर पालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2 नेहरूनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहिल. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
जाहिरात


