कल्याण लोकसभेच्या धावत्या दौऱ्या दरम्यान दिव्यात उद्धव ठाकरेंचा झंझावात दौरा!
ठाणे ; देवराज रावल कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना शनिवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दिव्यात झंजावात पाहिला मिळाला. शिवसैनिकांशी संवाद साधताना दिव्यातील पाणीटंचाईला जबाबदार असणाऱ्या शिंदे गटाला पाण्यात असं बुडवा की पुन्हा त्यांनी डोकं वर काढू नये,असा हल्लाबोलच उद्धव ठाकरे यांनी पाणी प्रश्नावर बोलताना केला.
उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने दिवा टर्निंग येथे जमले होते.ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या कार्यालयाजवळ उद्धव ठाकरे यांचे सुरुवातीला जल्लोषात स्वागत झाले.यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडी कडून ज्योती पाटील यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना गदा भेट देण्यात आली.
दिवा आगासन रोड येथील ज्योती पाटील यांच्या कार्यालयाजवळ स्वागत व कार्यालय भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिवा टर्निंग येथे उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केले. कल्याण लोकसभेतील गद्दारांची घराणेशाही गाडण्याचा निर्धार दिवावासीयांनी करावा असे आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केले.राम मंदिराच्या उद्घाटना बद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या व 22 तारखेला काळाराम मंदिर येथे शिवसेनेच्या माध्यमातून महाआरती केली जाणार असल्याचे यावेळी सांगितले. दिव्यात निवडणुका आल्या की दरवर्षी दहा एमएलडी पाणी वाढवल्याच्या घोषणा होतात.मात्र नागरिकांना पाणी मिळत नाही. 221 कोटीची पाणी योजना झाली पण लोकांना मुबलक पाणी मिळाले का?असा सवाल उद्धव ठाकरे यांनी दिवावासीयांना विचारला.जर दिवा वासियांना पाणी मिळत नसेल तर आता त्यांना पाण्यात बुडवा असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिव्यातील शिंदे गटाच्या भूमिकेवर केला.यावेळी हजारो शिवसैनिक व नागरिक उस्फुर्त व मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणतीही सभा नसताना नागरिकांनी केलेली प्रचंड गर्दी पाहून उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेत आपलाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला.यावेळी शिवसेना नेते संजय राऊत व राजन विचारे गुरुनाथ खोत वरून सरदेसाई देखील उपस्थित होते.
जाहिरात
जाहिरात