जागतिक कसोटी चॅम्पियनशिप; टीम इंडियाची अव्वलस्थानी झेप..

Spread the love

५ जानेवारी/दुबई: भारताने दुसर्‍या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. दुसरा सामना जिंकल्यानंतर भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्येही मोठा फायदा झाला आहे. या सामन्यापूर्वी पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या टीम इंडियाने मोठी झेप घेत थेट पहिले स्थान पटकावले आहे.

भारताने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी दोन जिंकले असून, एक गमावला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारत 26 गुणांसह अव्वलस्थानी आहे. संघाची विजयाची टक्केवारी 54 आहे. भारताला आता इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला मोठा फटका बसला आहे. त्यांनी गुणतालिकेतील अव्वल स्थान गमावले आहे. सेंच्युरियन कसोटी जिंकल्यानंतर प्रोटीज संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता; पण काही दिवसांतच त्यांना अव्वल स्थान गमवावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 50 वर घसरली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्या विजयाची टक्केवारी समान आहे. भारतीय संघाची विजयाची टक्केवारी आता 54.16 आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page