रायगडचे पोलिस उपअधीक्षक संजय सावंत यांचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू

Spread the love

रायगड :- रायगड जिल्हा पोलिस दलातील गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजय सावंत (वय ५७ ) यांचा राजस्थानमधील जैसलमेरजवळील अपघातात मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. त्यांच्या मोटरसायकलला जीपने बेदरकारपणे धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले . त्यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर रायगड पोलिस दलात शोककळा पसरली आहे.
संजय सावंत हे एक उत्तम खेळाडू होते. मोटरसायकलवरुन विविध प्रांतांत प्रवास करुन तेथील अभ्यास करण्याचा छंद त्यांना होता. आपल्या मोटरसायकलवरुन जैसलमेर येथून पुढील प्रवासासाठी ते निघाले होते. महामार्गावर पाठीमागून येणाऱ्या भरधाव जीपने त्यांच्या मोटरसायकलच्या उजव्या बाजूच्या फूटरेस्टला जोरदार धडक दिली. ते मोटरसायकलवरुन लांब अंतरावर फेकले गेले. गंभीररित्या जखमी झालेल्या संजय सावंत यांना रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
५ जानेवारी २००१ रोजी त्यांना एपीआय पदावर पदोन्नती मिळाली होती. त्यानंतर ते मुंबई पोलिस विशेष सुरक्षा पथकात दाखल झाले. त्यानंतर राज्य पोलिस नियंत्रण कक्ष आणि सायबर क्राईम ब्रॅच येथे त्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली होती. त्यांच्या सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशनच्या ज्ञानाचा अनुभव प्रशिक्षणार्थी होण्यासाठी त्यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकॅडमीत बदली केली होती. त्यांनंतर मे २०२३ मध्ये ते रायगड जिल्हा पोलिस दलात गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक या पदावर रुजू झाले होते. ३४ वर्षांच्या पोलिस सेवेत त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध पोलिस पारितोषिके मिळाली होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page