सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील स्वामी चेतना अपार्टमेंटमध्ये बंद सदनिका फोडल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुमाळ हे ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान कामानिमित्ताने सदनिका बंद करून महाड येथे गेले होते. ते ७ रोजी सकाळी १० च्या सुमारास आले असता त्यांच्या सदनिकेचा मुख्य दरवाजाचे कुलूप चोरट्याने कोणत्यातरी हत्याराने कापून त्याद्वारे सदनिकेमध्ये प्रवेश करून बेडरूममधील साहित्य चोरून नेले होते. हा प्रकार तिच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणी त्यांनी सावर्डे पोलिसांत फिर्याद दिली.
जाहिरात :