राजापूर : मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर संलग्न शैक्षणिक विभाग अंतर्गत “मार्गदर्शन आमचे, निवड तुमची!” या संकल्पनेच्या आधारे रविवार दि.०८ जानेवारी, २०२३ रोजी राजापूर तालुक्यातील श्री साई विमलेश्वर मंगल कार्यालय-ओणी येथे करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्यात आले, यामध्ये साडे पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कोकणची शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यादृष्टीने मुलांना योग्य दिशा (Direction) देणे गरजेचे आहे. म्हणूनच चला निर्माण करूया “कोकण पॅटर्न” चा संकल्प रचत या शिबिराचे आयोजन ओणी येथे करण्यात आले. मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष तांबे यांनी आजचा युवक हे उद्याचे भविष्य असून समाजाकडे सकारत्मक दृष्टीने बघण्याचा नव्या पिढीला कानमंत्र दिला, परीसारतील ढासळत असलेली आरोग्य व्यवस्था याकडे उपस्थितीत युवकवर्ग, पालक आणि मान्यवरांचे लक्ष केंद्रीत केले. संस्थेने केलेल्या सामाजिक कार्याची संक्षिप्त मांडणी केली. “कोकण पॅटर्न” विकास मध्ये आपले करिअर करावे असे हि ते म्हणले.
आयकर निरीक्षक श्री. वैभव भगते सर, राजापूर पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, श्री सरस्वती विद्या निकेतन शाळा खावडी हायस्कुलचचे मुख्याध्यापक मान. श्री. डी. डी.देसाई सर यांच्याकडून उपस्थित विद्यार्थाना उत्तम मार्गदर्शन लाभले. सदर करिअर मार्गदर्शनात दहावी बारावी नंतरची तयारी तसेच विद्यार्थ्यांना भविष्याच्यादृष्टीने केंद्रस्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी त्याबरोबर प्रशासकीय-शासकीय नोकर भरती माहितीबाबत विद्यार्थांमध्ये जागरूकता निर्माण करून यापुढे संस्थेच्या शैक्षणिक विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल अशी करिअर टीम चे प्रमुख श्री वैभव भगते सरांनी उपस्थितांना अश्वासीत केले. पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर यांनी मला पोलीस व्हायचे असेल तर सह व्यक्तिमत्त्व विकास यावर प्रकाश टाकत उपस्थित विद्यार्थ्यांना जगण्याचा कानमंत्र दिला. खावडी हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री. डी. डी. देसाई सरांनी मला शिक्षक व्हायचे असेल तर व्यक्तिमत्त्व विकास महत्वाचा आहे असे हि ते म्हणले.
एम. पी. व्ही. एस. आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिराच्या कार्यक्रम प्रसंगी राजापूर पंचायत समिती राजापूर सदस्य प्रतिकजी मटकर साहेब, माजी सल्लागार डॉ. महेंद्र गुजर, सल्लागार श्री. रविंद्रजी मटकर, आदी मुख्य कार्यकारिणी पदाधिकारी, कार्यकारी सदस्य, चुनाकोळवणगावचे सरपंच श्रीकांत मटकर, कळसवली गावचे सरपंच श्री देवेश तळेकर, रूण गावचे सरपंच श्री. सुहास साखळकर, वडदहसोळचे उपसरपंच श्री. हातणकर तसेच तालुक्यातील विद्यालय-महाविद्यालयीन शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव श्री. अजयजी मांडवकर आणि उपाध्यक्ष श्री सुजय गितये नी सूत्रसंचालन केले. र्यक्रमाच्या शेवटी श्री शैलेश गुरव यांनी सर्व आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्य, हितचिंतक व उपस्थितांचे आभार मानले.
जाहिरात :