घाट अपघात प्रकरणी टेम्पो ;चालकाविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

खेड :- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवार सायंकाळी झालेल्या अपघात प्रकरणी आयशर टेम्पो चालकाविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडमधील भोस्ते घाटात मंगळवार , दि . ७ रोजी रमजान अली बाबुल्ला अन्सारी ( रा . मिथानी महारूवा ता . भेटी जिल्हा आंबेडकर नगर राज्य उत्तरप्रदेश ) हा टेम्पो ( एमएच ०४ जी ७६६८ ) घेऊन येताना नियंत्रण सुटल्याने त्याची धडक बोलेरो गाडी ( एमएच ०९ बीएम ७९३६ ) व टेम्पो ( एमएच ११ बीएल ३८९२ ) या वाहनांना धडक दिली . या प्रकरणी अमीत अर्जुन पवार ( ३५ रा . भवानीनगर वाळवा जि . सांगली ) यांनी तक्रार दाखल केली आहे . त्या अनुषंगाने तीन वाहनांच्या नुकसानीस व प्रवाशांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी टेम्पोचालक रमजान अली बाबुल्ला अन्सारी याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page