हिंदूह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केल्याप्रकरणी दिव्यात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
ठाणे : निलेश घाग बाळासाहेबांच्या भावना काय असतील असा प्रश्न पत्रकारांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना विचारला असता वर जाऊन विचारावे लागेल असे उर्मट उत्तर देऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्या गोगावले यांच्या फोटोला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आज दिव्यात जोडे मारत आंदोलन करण्यात आले.
उद्धव ठाकरें गटाच्या शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी दिवा टर्निंग येथे आमदार भरत गोगावले यांच्या फोटोला काळे फासत जोडे मारो आंदोलन केले. भरत गोगावले यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करत लाखो शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिवा शहरातील शिवसैनिक करीत जोर धरीत आहेत. एका टीव्ही चॅनलच्या पत्रकाराने गोगावले यांना बाळासाहेबांच्या भावना काय असतील असा प्रश्न विचारला असता वर जाऊन विचारावे असा टोला लगावला असे उर्मट उत्तर देऊन बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत दिव्यातील शिवसैनिकांनी दिवा टर्निंग येथे गोगावले यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केले.
पहा सविस्तर व्हिडिओ…”नेमके काय घडले”
शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल कोणताही आदर नाही केवळ मतांसाठी ते बाळासाहेबांचा फोटो वापरू इच्छित आहेत असा आरोप दिव्यातील शिवसैनिकांनी केला आहे. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे,अभिषेक ठाकूर युवा अधिकारी योगिता नाईकविधानसभा दिवाशहर संघटिका ज्योती पाटील शहर संघटिका तेजस पोरजी उपशहर प्रमुख वैष्णव पाटील उप शहर प्रमुख प्रियंका सावंतउपशहर संघटिका चेतन पाटील विभाग प्रमुख मच्छिंद्रनाथ लाड विभाग प्रमुख,अक्षय म्हात्रे उपशहर अधिकारी स्मिता जाधव विभाग संघटिका,मयुरी पोरजी विभाग संघटिका गुरुनाथ पाटील उपविभाग प्रमुख,विनय कदम उपविभाग संघटिका,अजित माने,निलेश चाळके,राज कदम, संजय जाधव, नागेश पवार, गणेश सावंत, अमित गुप्ता, लवकुश,अग्रहारी, प्रतीक म्हात्रे, ओकेश म्हात्रे,रोहित भाईजे,चेतन पाटील, अनिरुद्ध तिवारी,अनिल पवार, विकास उत्तेकर,अमितराज गुप्ता, संजय कनोजिया आदी शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख, गटप्रमुखअन्य युवासेना शिवसेनेचे महिला पुरुष मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
जाहिरात
जाहिरात