नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नेरळ आणि एच.डी. एफ. सी. सिक्योरिटीज लिमिटेड, मुंबई ह्यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ आणि परिसरातील गरजु शाळांना सामाजिक शैक्षणिक विकास उपक्रमांतर्गत संगणक (कॉम्प्युटर) वाटप.
विद्या मंदिर संस्थेचे विवेक पोतदार यांचे प्रतिपादन
नेरळ विद्या मंदिर शाळेला १० संगणक संच
नेरळ: सुमित क्षीरसागर
शिक्षणात आधुनिकता येत आहे. शिक्षण पद्धत बदलत आहे. अशात विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी शैक्षणिक संस्था अग्रेसर आहेतच मात्र विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण मिळावे यासाठी सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे. तर याच शाळेमध्ये शिकलेले आमचे विद्यार्थी आज शाळेसाठी काहीतरी करण्याची भावना घेऊन उपक्रम राबवत असल्याचे पाहून आनंद वाटल्याचे प्रतिपादन विद्या मंदिर संस्थेचे संयुक्त सचिव विवेक पोतदार यांनी केले आहे. नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व एचडीएफसी सिक्युरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळांना संगणक वाटपाचा कार्यक्रम नेरळ विद्या मंदिर शाळेत पार पडला याप्रसंगी पोतदार बोलत होते.
एचडीएफसी सिक्युरिटी व नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, नेरळ विद्या मंदिर व नेरळ विद्या विकास या शाळांना संगणक संच वाटप करण्याचा कार्यक्रम शनिवार दिनांक १६ रोजी नेरळ विद्या मंदिर शाळेत पार पडला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून एचडीएफसी सिक्युरिटीचे उपाध्यक्ष सत्येन दोशी, सहाय्यक उपाध्यक्ष अर्पित पोरवाल, सचिव मितुल पालनकर, सहाय्यक सचिव मिलन सोमाणी, चिराग गुप्ता, तर विद्या मंदिर मंडळ महिमचे संयुक्त सचिव विवेक पोतदार, संस्थेचे मिलिंद पोतदार, राजू झुगरे, अमरीश शहा नेरळ राजा मंडळाचे अध्यक्ष मधुकर मोडक, जयवंत साळुंके, केतन पोतदार, विशाल साळुंके, आशिष सुर्वे, श्याम कडव, अल्पेश मनवे, आदित्य यादव, मंगेश मोरे, यतीन यादव निलेश धरणे, कल्पेश देशमुख, ऋतिक शहा, ओमकार बाचम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषद शाळा कूंभे , आनंदवाडी, कोल्हारे, राजिप कन्या शाळा क्रमांक २, राजीप शाळा धामोते, कोल्हारे, आदिवासी विकास आश्रमशाळा माणगाववाडी आदी शाळांना प्रत्येकी १ तर नेरळ विद्या विकास शाळेला ३ संगणक संच व नेरळ विद्या मंदिर शाळेला १० संगणक संच देण्यात आले.
यावेळी नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना ही स्वातंत्र्यपूर्व काळातील असून १९४५ साली झालेली आहे. गेले अनेक वर्षे हा उत्सव सुरू असताना हा केवळ उत्सव न राहता यातून सामाजिक दायित्व म्हणून सामजिक उपक्रम आम्ही राबवत आहोत. जेणेकरून नागरिकांना याचा फायदा व्हावा. कोरोनामध्ये मंडळाने धान्याचे किट वाटत आपले दायित्व पूर्ण केले असे उपक्रम कायम सुरू राहतील असे मंडळाचे श्याम कडव यांनी सांगितले.
याप्रसंगी सर्व शाळांचे शिक्षक उपस्थित होते. सर नेरळ विद्या मंदिराचे बोरसे सर व उपस्थित शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल मान्यवरांचे आभार मानले.