सोलापूर : सोलापूरकरांसाठी गुड न्यूज आहे. सोलापूरला आणखी एक वंदे भारत रेल्वे मिळणार आहे. दक्षिण रेल्वे विभागाने मागच्या आठवड्यात सिकंदराबाद-पुण्यासाठी वंदे भारत गाडीची घोषणा केली असून, ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणार आहे. त्यामुळे सोलापूर, मुंबईनंतर आता सोलापूरला दुसरी वंदे भारत गाडी मिळणार आहे. यामुळे सोलापूरकरांचा पुणे आणि हैदराबादचा प्रवास आणखीन सुखकर आणि गतिमान होणार आहे.
सिकंदराबाद-पुणे सोबत सिकंदराबाद-तिरुपती, सिकंदराबाद-बंगळुरू अशा तीन वंदे भारत गाड्यांची घोषणा झाली आहे. या गाड्या कधी सुरू होतील, याच्या तारखाही लवकरच जाहीर होतील. दक्षिण रेल्वे विभागाकडून त्याची तयारी सुरू आहे. सिकंदराबाद पुणे वंदे भारत सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणार असल्याने सोलापूरकरांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्या पुणे ते हैदराबादसाठी शताब्दी एक्सप्रेस गाडी सुरू आहे. यासह इतर अनेक गाड्या सुरू आहेत. वंदे भारत ही गाडी आरामदायी आणि वेगवान असल्याने उद्योजकांना याचा मोठा मोठा फायदा होईल.
जाहिरात :