आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नाने हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये चिपळुण-संगमेश्वर मतदार संघासाठी ५४ कोटीचा निधी मंजूर…

Spread the love

नागपूर- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये चिपळुण-संगमेश्वर मतदार संघासाठी ५४ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था पाहता या रस्त्यांची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने व दळणवळणासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी ओढाताण संपविण्यासाठी आमदारांनी सबब बाब महायुती सरकारच्या लक्षात आणून दिली. आमदारांच्या या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. या अनुषंगाने आमदार शेखर निकम यांनी चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण मार्गांसाठी 12 कोटी 81 लाख निधी मंजूर केला.

त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारे रस्ते, पुल, वॉल यांसाठी चिपळूण व संगमेश्वर तालुक्यांसाठी 41 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मतदार संघासाठी दिलेल्या या निधीबद्दल आमदार शेखर निकम यांनी महायुती सरकारचे नेते मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांचे आभार मानले आहेत. सोबतच कोकणचे पहिले सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रविंद्रजी चव्हाण यांचे देखील विशेष आभार मानले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page