भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांचे अभिवादन…

Spread the love

बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या पवित्र संविधानाचा मला सार्थ अभिमान- पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या जगातील पवित्र संविधानाचा मला भारतीय म्हणून सार्थ अभिमान असल्याचे यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

रत्नागिरी येथील जिल्हा शासकिय रूग्णालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री श्री. उदय सामंत यांनी पुष्पहार अर्पण करुन आणि पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातले सगळ्यात चांगले संविधान देशाला दिलेले आहे. त्यांच्यामुळेच आम्ही आमदार, खासदार, मंत्री पदापर्यंत पोहोचू शकतो याची आम्हाला जाण आहे. बाबासाहेबांनी जगातील सगळ्यात पवित्र संविधान देशाला दिलं.

याचा मला भारतीय म्हणून सार्थ अभिमान असल्याचेही यावेळी पालकमंत्री म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page