आमदार चषक राज्यस्तरीय कँरम स्पर्धेचे उदघाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न..

Spread the love

▪️देवरुख/जनशक्तीचा दबाव-
देवरुख हे कब्बडी चे माहेर घर आहे तसे ते कॅरमचेही माहेर घर आहे.देवरुख शहरातून गुणी कॅरम पट्टू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा मधून खेळले आहेत ही बाब देवरुख शहरासाठी अभिमानास्पद आहे असे आमदार शेखर निकम म्हणाले. शालेय व महाविद्यालय स्तरावर स्पर्धा प्रमाण काही कमी दिसतात हि बाब चिंताजनक असून शाळा व महाविद्यालय स्तरावरून गुणी खेळाडू घडत असतात अश्या खेळाडुना पाठबळ देणे गरजेचे असते. अशा खेळाडूना आपण नक्कीच पाठबळ देऊ असेही निकम म्हणाले.

▪️स्पर्धेदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील युवा कँरमपट्टूंचा यथोचित सत्कार करण्यात आला.चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी पुरस्कृत केलेल्या, रत्नागिरी जिल्हा कँरम असोसिएशन आयोजित व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आमदार चषक राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन समारंभ शुक्रवारी आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाला.

▪️स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतीन ठाकूर, संंगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे, गटविकास अधिकारी भरत चौगले,आयोजक रत्नागिरी जिल्हा कँरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सचिव मिलींद साप्ते, खजिनदार नितीन लिमये, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी सचिन मांडवकर, स्पर्धा प्रमुख मोहन हजारेआंतरराष्ट्रीय कॅरमपट्टू शिव छञपती पुरस्कार विजेता संदिप देवरूखकर, रियाज अकबर अली,संंगमेश्वर तालुका बँडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश प्रभुदेसाई, स्पर्धा प्रमुख मोहन हजारे, अभिनेते आसित रेडीज , राहूल भस्मे, दिलीप विंचू, दामोदर साळस्कर, बाबा बेंडके, बाळू ढवळे, हनिफ हरचिरकर, सुचयअण्णा रेडीज, निकेत सुर्वे,पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड, मंगेश बांडागळे, राजु वणकुद्रे आदी उपस्थित होते.

▪️यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते संदिप देवरुखकर व रियाज अकबर अली तसेच युवा कँरमपट्टू आकांक्षा कदम, निधी सप्रे, स्वरा मोहिरे ,गुंजन खवळे, ओम पारकर, रोहन शिंदे, यश मोहिरे, द्रोण हजारे, राहुल भस्मे, अभिषेक चव्हाण योगेश कोंडविलकर यांचा सत्कार करण्यात आला.

▪️महाराष्ट्र व जिल्हा असोशिएशन तर्फे आमदार शेखर निकम यांना कॅरम प्रतिकृती असलेले घड्याळ भेट म्हणुन देण्यात आले. यावर मनोगतात निकम म्हणाले माणसे बदलत असतात,मला आठवणी साठी घड्याळ भेट दिले आहे. कॅरम प्रतिकृती असली तरी मी चिन्ह विसरु नये यासाठी हि भेट दिली असावी असे बोलल्यावर सभागृृहात हास्याचे फवारे उडाले.
.
▪️कॅरम खेळाडुंसाठी आरक्षण असते का हे मी माहिती करुन घेतो व पदाधिकार्‍यासह आपण क्रीडामंञ्यांची भेटही घेवु असेही श्री निकम म्हणाले

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page