दिव्यातील राजकारणाला नाट्यमय वळण ; पहा कुणी केला कुठल्या पक्षात प्रवेश

Spread the love

ठाणे : काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिका निवडणूकीच्या (Thane Municipal corporation) पार्श्वभूमीवर दिव्यात शिवसेनेने (shivsena) भाजपला (bjp) मागील वर्षी धक्का दिला होता. ऍड.आदेश भगत हे शिवसेनेत जाणार असल्याची कुणकुण लागताच भाजपने निलेश पाटील यांच्या खांद्यावर मंडल अध्यक्ष पदाची धुरा दिली. मात्र या नियुक्तीला काही अवधी होत नाही तोच निलेश पाटील, अर्चना पाटील यांनाही शिंदे गटाने गळाला लावत भाजपला जोरदार दुसरा धक्का दिला . २०१७ च्या निवडणूकीत ठाण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्यात दिव्याचा (diva political update) मोठा वाटा होता. आगामी निवडणुकीत दिव्यात वाढलेली एक जागा न सोडण्यासाठी शिवसेनेने ही खेळी आखत भाजपचे बळ दिव्यातून कमी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आता येथे काय वेगळी रणनिती आखते हे पहावे लागेल.

ठाणे महापालिका हद्दीचा भाग असलेल्या दिव्यात आठ प्रभाग असून तिथे सध्या शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. दिव्यातील विजयाचे गणित जमविण्यासाठी भाजपने गेल्या निवडणूकीत प्रयत्न केले होते. मात्र पूर्वी मनसेतून विजयी झालेले शैलेश पाटील यांना पक्षात घेत शिवसेनेने भाजपचा पराभव केला होता. ठाणे महापालिकेत प्रथमच शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली होती. त्यात दिव्याचा मोठा वाटा असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यातील रमाकांत मढवी यांची उपमहापौरपदी निवड केली होती. सत्ताधारी नगरसेवक आणि उपमहापौर पद दिव्याला मिळूनही दिव्याचा हवा तसा विकास झालेला नाही

दिव्यात सेनेची ताकद वाढत असल्याने भाजप आणि मनसेची युती होते का हे आता पहावे लागेल. मागील २७ जानेवारीला आदेश भगत व त्यांच्या पत्नीने सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता १५ फेब्रुवारीला निलेश यांनी पत्नी अर्चनासह सेनेत प्रवेश केला आहे- पाटील दांम्पत्य हे भाजपमधील एक आक्रमक चेहरा असून त्यांचे राजकीय तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात योगदान आहे. – दिव्यातील भाजपचे महत्वाचे पदाधिकारीच नक्की कोणत्या शिवसेनेत गेले आहेत असा संभ्रम दिव्यातील स्थानीक मतदार करीत आहे.

दिव्यात कोण कितपत आपल्या पक्षाची धुरा सांभाळतात कि ते ही दुसऱ्या पक्षात जातात का? हे पहावे लागेल.

दिवा भाजपातील रोहीदास मुंडे यांच्यावर पक्षाची धुरा सोपवली परंतू त्यांनीही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला.

त्यांच्या मागे तन्वी फाउंडेशन व दिवा भाजपच्या महिला अध्यक्षा सौ.ज्योती राजकांत पाटिल आणि यावेळी दिवा मनसेच्या मयुरी पोरजी व तेजस पोरजी यांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

घराची वास्तू बदल्याने, घरातील संसार व्यवस्थित थाटला असे होत नाही :- श्री.तुषार पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर अध्यक्ष

असे असताना कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार राजू रतन पाटील यांचे कट्टर समर्थक राज साहेबांच्या विचारावर चालणारे अत्यंत संवेदनशील श्री. तुषार पाटील मनसे दिवा शहर अध्यक्ष यांनी दबावच्या प्रतिनिधी सोबत सवांद साधताना आपण कुठल्याही पक्षाच्या अधीन जाणार नसून महाराष्ट्र नवनिर्माणसेने सोबत होतो आणि ह्या पुढेही शेवटच्या श्वासापर्यंत दिव्याच्या विकासाठी झटत राहणार,”कोण कुठल्या पक्षात गेल्याने काही फरक पडत नाही”, “फरक पडतो तो फक्त विचारांचा” दिव्यातील जनता सूज्ञान आहे. असे मत श्री.तुषार पाटील यांनी व्यक्त केले.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page