बँकॉकचा दौरा यशस्वी करुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे उद्या शनिवारी सायंकाळी मुंबई विमानतळावर होणार आगमन
मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने होणार भव्य स्वागत – सिद्धार्थ कासारे
मुंबई दि.24- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे 3 दिवसांचा थायलंडमधील बँकॉकचा दौरा यशस्वी पूर्ण करुन उद्या शनिवार दि. 25 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना बँकॉक येथे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्ट या जागतिक बौध्द संघटनेचा आंतरराष्ट्रीय मानद उपाध्यक्ष पदाचा बहुमान प्राप्त झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्ट ही ऐतिहासीक आणि जागतिक प्रमुख बौध्द संघटना आहे. या बौध्द संघटनेच्या आंतरराष्ट्रीय मानद उपाध्यक्षपदी ना.रामदास आठवले यांची निवड झाल्यामुळे भारतीय बौद्धांमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांचा रिपब्लिकन पक्ष मुंबई प्रदेशच्या वतीने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी दिली आहे.
केंद्रीय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले; पुत्र जित आठवले; युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशन चे अध्यक्ष अविनाश कांबळे; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आदी मान्यवरांचे यावेळी आगमन होणार आहे.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबईतील सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व कार्यकर्ते आणि सर्व आघाडींच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रिपाइं मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी केले आहे. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; सुरेश बारशिंग; बाळासाहेब गरुड ; विवेक गोविंदराव पवार ; सुनील बन्सी मोरे आदी मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. ना.रामदास आठवले यांच्या स्वागतासाठी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, जिल्हा अध्यक्ष साधु कटके, अजित रणदिवे, संजय डोळसे ; रमेश गायकवाड, संजय पवार, प्रकाश कमलाकर जाधव आदिंनी केले आहे.