मुंबई विमानतळ बाँम्बने उडवून देण्याची धमकी…

Spread the love

इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकीचा फोन.

जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | फेब्रुवारी ०७, २०२३.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटाने उडवून देणार अशी धमकी देण्यात आली आहे. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकी देण्यात आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने मुंबई विमानतळावर फोन करून धमकी दिली. विमानतळ स्फोटकाने उडवून टाकू अशी धमकी या माथेफिरूने दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने इरफान अहमद शेख असं आपलं नाव सांगितलं. तो स्वत: ला इंडियन मुजाहिद्दीन नावाच्या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचं सांगत आहे. फोनवर धमकी दिल्यानंतर तो कोडवर्डमध्ये बोलत होता.

त्यानंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने सूत्रं फिरवली असून सर्व तपास यंत्रणांना यााची माहिती दिली आहे. विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सहारा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात IPC कलम ५०५(१) नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page