नवी दिल्ली- वर्ल्डकपनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा संघ टी२० सामनांमध्ये आमने-सामने येणार आहे. या सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा भारतीय क्रिकेट मंडळाकडून करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संघामध्ये टी-२० च्या ५ सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून हे सामने भारतात होणार आहेत. या मालिकेसाठी बीसीसीआयनं एका नव्या खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.
विशाखापट्टणम येथे २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यर रायपूर आणि बेंगळुरूमधील शेवटच्या दोन T२० सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून भूमिका निभावणार आहे. दोन्ही संघात होणारी ५ सामन्यांची टी २० मालिका ३ डिसेंबरला संपणार आहे. बेंगळुरूमध्ये या मालिकेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे.
दरम्यान वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. विश्वचषक संघाचा भाग असलेल्या प्रसिद्ध कृष्णाचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव सध्या T२० मध्ये नंबर एकचा फलंदाज आहे. सूर्यकुमार यादवने भारतासाठी आतापर्यंत ५३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४६.०२ च्या सरासरीने आणि १७२.७ च्या स्ट्राईक रेटने १०६६ धावा केल्या आहेत.
भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रशीद कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.