संगमेश्वरमध्ये भाजपाकडून राष्ट्रवादीला दे धक्का, कुडवलीतील नागरिकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

Spread the love

भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक अमोल गायकर,तालुका उपाध्यक्ष स्वप्नील शिंदे आणि तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष देवदत्त भाटये, यांच्या अथक प्रयत्नाने कुडवली मधील नागरिकांचा पक्षप्रवेश

सदर पक्षप्रवेश चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांच्या उपस्थितमध्ये पार पडला

संगमेश्वर ( देवरुख) – भाजपा पक्ष संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी इतर राजकीय पक्षाना धक्का देत मुसंडी मारताना दिसुन येत आहे.दिवसेंदिवस संगमेश्वर तालुक्यातील राजकीय गणिते बदलत असताना दिसत आहेत, कोसुंब पंचायत समितीतील अनेक गावातील ग्रामस्थांनी मागच्या काही दिवसांत भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत व तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज देवरुख येथील संगमेश्वर भाजपा कार्यालय येथे भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक अमोल गायकर आणि तालुका उपाध्यक्ष स्वप्नील शिंदे,युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष देवदत्त भाटये यांच्या अथक प्रयत्नाने कुडवली मधील युवा नेते रितेश मिरगल आणि ग्रामपंचायत सदस्य विशाल नवेले यांच्यासह आदी ग्रामस्थांनी आज भाजपा मध्ये पक्षप्रवेश केला.सदर पक्षप्रवेश हा चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. पक्ष प्रवेशकर्ते यांचे तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांनी स्वागत केले.

यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष अभिजित शेट्ये, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधीर यशवंतराव, देवरुख शहराध्यक्ष सुशांत मुळे,
रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रमोद शिंदे,विनोद गायकर,अनंत पाताडे आदी उपस्थित होते.

🔹️भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रसेवेला प्रेरित होऊन त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्ष प्रवेश करीत आहोत, मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजना बूथवरील प्रत्येक घराघरामध्ये पोहचविणार असे मत प्रवेशकर्ते रितेश मिरगलं यांनी मांडले.

भारतीय जनता पार्टी देवरुख मधील येथील कार्यालयामध्ये रितेश मिरगल, ग्रामपंचायत सदस्य विशाल नवेले,संतोष मिरगल,मयूर मिरगल,रोहित मिरगल,विक्रांत मिरगल,विशाखा मिरगल,निता गायकर,सुजाता मिरगल,विलास मिरगल. सह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेली अनेक दिवस पक्षप्रवेश चालू आहेत. भारतीय जनता पार्टी बुध पासून पार्लमेंट पर्यंत मजबूत होत असल्याचे संगमेश्वर मध्ये दिसून येत आहे. आगामी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीचे चांगले योगदान राहील असे यावरून दिसून येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page