सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
कुडाळ-औदुंबरनगर येथे कुडाळचे नायब तहसीलदार व एका तलाठ्याला बेदम मारहाण प्रकरणातील संशयित वाळू व्यावसायिकापैकी सातजणांना कुडाळ पोलिसांनी हायवेवर झाराप येथून शुक्रवारी रात्री ताब्यात घेत अटक केली. त्या सातहीजणांना शनिवारी सकाळी येथील न्यायालयात हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बाचुलकर यांनी ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.
या गुन्ह्यात संशयितांनी वापरलेली इनोव्हा कार तसेच चार डंपर ताब्यात घेण्यात आले. तर चार दुचाकी, जप्तीनामा जप्त करायचा असून चारही डंपरचे चालक व अन्य साथीदारांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घ्यायचे आहे असे कुडाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.