जडेजाचा ‘पंच’, कोहलीचं शतक, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी विजय…

Spread the love

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकाचा खुर्दा उडवलाय. टीम इंडियाने 243 धावांच्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान कायम राखलंय.

कोलकाता/ जनशक्तीचा दबाव- टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. टीम इंडियाने सलग आठवा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकाचा 243 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकाला विजयासाठी 327 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकाने गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकाला 27.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 83 धावाच करता आल्या. रविंद्र जडेजा आणि विराट कोहली हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच इतरांनीही चांगलं योगदान दिलं.

दक्षिण आफ्रिकाची बॅटिंग…

टीम इंडियाच्या भेदक, धारदार आणि फिरकी बॉलिंगसमोर दक्षिण आफ्रिकाचे फलंदाज सपशेल फ्लॉप ठरले. दक्षिण आफ्रिकाच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर चौघांनी 10 पेक्षा अधिक धावा केल्या. मार्को जान्सेन याने सर्वाधिक 14 रन्स केल्या. रॅसी व्हॅन डर ड्युसेन याने 13 धावा जोडल्या. कॅप्टन टेम्बा बावुमा आणि डेव्हिड मिलर या दोघांनी प्रत्येकी 11 धावांचं योगदान दिलं. लुंगी एन्गिडी झिरोवर आऊट झाला. तर तरबेझ शम्सी 4 धावांवर नाबाद परतला.

जडेजाचा दक्षिण आफ्रिकाला पंच…..

टीम इंडियाकडून रविंद्र जडेजा याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जडेजा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी 5 विकेट्स घेणारा दुसरा स्पिनर ठरला. जड्डूने 9 ओव्हरमध्ये 33 धावांच्या मोबदल्यात या 5 विकेट्स मिळवल्या. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव या जोडीने 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकाला पद्धतशीर गुंडाळलं.

दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. विराट कोहली याच्या 101 आणि श्रेयस अय्यर याच्या 77 धावांच्या मदतीने टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 326 धावा केल्या. टीम इंडियाकडून विराट-श्रेयस व्यतिरिक्त कॅप्टन रोहित (40), रविंद्र जडेजा (29*), शुबमन गिल 23, सूर्यकुमार यादव (22) आणि केएल राहुल याने 8 धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकाकडून 5 गोलंदाजांच्या खात्यात 1-1 विकेट गेली. टीम इंडियाने या विजयासह आता पॉइंट्स टेबलमधील आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलंय.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन) क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page