जितेंद्र आव्हाड, त्वरित माफी मागा; अन्यथा… – भाजपा, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | फेब्रुवारी ०६, २०२३.

छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहेत. आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासारखी औरंगजेब आणि शायिस्तेखानाची पिलावळ जर महाराजांचा असा अपमान करणार असेल तर भाजपा हे मुळीच खपवून घेणार नाही.

जितेंद्र आव्हाड अशा प्रकारची वक्तव्ये जाणीवपूर्वक वारंवार करीत आहेत हे महाराष्ट्राला कळून चुकले आहे. आता ते शिवप्रेमींच्या भावनांचा कडेलोट होत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत त्वरित माफी मागावी अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या माध्यामातून राज्यभर औरंगजेबधार्जिण्या आव्हाड यांचे पुतळे जाळून निषेध आंदोलन करेल.

आव्हाडांनी जर अशी नालायकपणाची वक्तव्य त्वरित थांबवली नाहीत तर औरंगझेबाच्या या पिलावळीला भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्रात फिरू देणार नाही. असा सणसणीत इशारा सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी दिला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page