महिला मोर्चा चिपळूण शहराध्यक्षपदी शीतल रानडे…

Spread the love

चिपळूण: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रत्नागिरी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी नुकतीच जिल्ह्याची महिला मोर्चा कार्यकारिणी जाहीर केली. चिपळूणमधील मार्कंडी येथे भाजपा कार्यालयात हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा वर्षा भोसले, सरचिटणीस मंजुषा कुद्रिमोती, प्रदेश सचिव शिल्पा मराठे, देविका मिश्रा, माजी नगरसेविका रसिका देवळेकर यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा वर्षा भोसले यांनी संबोधित करताना मोदी सरकारच्या अनेक योजना उपस्थित महिला कार्यकर्त्यांना सांगितल्या. तसेच महिलांसाठी राज्य व केंद्र सरकारने घेतलेले उल्लेखनीय निर्णय सुद्धा विषद केले. यामध्ये प्रामुख्याने उज्वला गॅस योजना, महिलांसाठी लोकसभा विधानसभा मध्ये ३३% आरक्षण, तीन तलाकचा निर्णय, राज्य सरकारने महिलांसाठी घेतलेला एस. टी. च्या निम्म्या तिकीट दराचा निर्णय आदींचा समावेश होता. तसेच पंतप्रधान मोदींनी एका आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च स्थानी राष्ट्रपती विराजमान करून केलेला महिलेचा सन्मान हा विषयही त्यांनी उपस्थित महिलांना आवर्जून सांगितला.

यानंतर महिला मोर्चा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये चिपळूण शहराध्यक्षपदी शीतल रानडे, जिल्हा सरचिटणीस पदी गौरी कैलास भांबूरे, जिल्हा चिटणीस पदी स्नेहल पालकर, गायन वादन लोककला महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी निकिता सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष पदी सोनल कारेकर, जिल्हा सोशल मीडिया संयोजक पदी सुनीता सुर्वे, सह संयोजक जया केतकर, सह संयोजक गुंजन गुप्ता तर गार्गी हळदे, नेहा खेडेकर, अमृता जोशी, मृणाल खानविलकर, पूजा जोशी यांची सोशल मीडिया सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच कार्यकारिणीमध्ये मधुरा बनसोडे, तनुजा चव्हाण, दिपाली मुळे, भाग्यश्री यमकनमर्डी, सायली डोंगरे यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले.

सदर कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आशिष खातू, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदेश ओक, शहर पदाधिकारी विनायक वरवडेकर, निनाद आवटे, कामगार मोर्चा पदाधिकारी उल्हास भोसले, सुनीत खेराडे, युवा मोर्चाचे ऋतुज डाकवे यांची उपस्थिती होती. सर्व नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. सूत्रसंचालन तालुका प्रसिद्धी प्रमुख मंदार कदम यांनी केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page