अपघाताची शक्यता
दिपक भोसले/संगमेश्वर संगमेश्वर ते कोल्हापूर राज्यमार्गावर संगमेश्वर ते साखरपा दरम्यान साईड पट्ट्यांवर गवत उगवल्याने हा मार्ग वाहनांसाठी धोकादायक बनला आहे.
संगमेश्वर ते साखरपा रस्ता डांबरीकरणासाठी आणि रस्ता रुंदीकरणासाठी ३२ कोटी रुपये खर्च करून हा मार्ग बनवण्यात आला आहे. मात्र या वर्षीच्या मुसळधार पावसामुळे रस्तेच्या साईड पट्ट्यांवर गवत उगवले आहे. साईड पट्ट्यांवर उगवणारे गवत कापणे आवश्यक आहे
या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांना साईड पट्ट्यावरील गवतामुळे आणि झाडे झुडपामुळे पुढील वाहने दिसून येत नाही तसेच साईडपट्ट्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा वाहनांचे अपघात घडत आहेत. वारंवार होणारे अपघात दूर करण्यासाठी साईड पट्टीवरील गवत कापून ते त्वरित दूर करण्यात यावे अशी मागणी होत आहे.