चिपळूण :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेखनाका येथील उड्डाणपूल दुर्घटनेप्रकरणी चौकशीसाठी २५ ऑक्टोबरपासून तीन दिवस केंद्रीय समिती या कोसळलेल्या पुलाची चौकशी करणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी पहाटे येथील बहाद्दूरशेख नाका येथे भेट देऊन, मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली व या उड्डाणपुली राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या तीन तज्ज्ञ समितीकडून तपासणी करण्यो जाहीर केले होते. त्यानुसार आयआयटी रवी सिन्हा, टंडन कन्सल्टन्सी मनोघ गुप्ता, हेगडे कन्सल्टन्सी सुब्रमण्यम हेगडे या तीन तज्ज्ञ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.