जनशक्तीचा दबाव न्यूज | कर्जत | फेब्रुवारी ०५, २०२३.
रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरातील रायगड जिल्हा बँकेला आज रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली आहे. शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकातील श्री कपालेश्वर मंदिराच्या पहिल्या मजल्यावर ही बँक आहे. ही आग पहाटे चार ते पाचच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात लागल्याचे बोलले जात आहे.
या आगीत संपूर्ण शाखा जळून खाक झाली आहे. याप्रकरणी आग विझवण्याचे काम अद्यापही सुरू आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. घटनास्थळी कर्जत नगरपरिषदेचे अग्निशमन दल, तसेच खोपोली येथील अग्निशमन दल पोहचवून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अजूनही कुलिंगचे काम सुरू आहे.
अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरत एकाच खळबळ उडाली होती. पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याने यावेळी नागरिक गाढ झोपेत होते. तर कामाला जाणाऱ्या नागरिकांना ही आग दिसून आल्याने माहिती झाल्याचे सांगण्यात आलं. मात्र या आगीत बँक पूर्ण जळून खाक झाली आहे.आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नसून प्रथम दर्शनी ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.