
दिवा आगासान मेन रोडलगच्या एस.एम.जी विद्यामंदिर जवळ गतिरोधक बसविण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिष्टमंडळाने दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त यांना दिले. एस एम जी विद्यामंदिर शाळेजवळ बी.आर नगर येथे गतिरोधकची मागणी

ठाणे : निलेश घाग दिवा आगासन रोड येथे एस.एम.जी विद्यामंदिर मुख्य रस्त्यावरच प्राथमिक तसेच ज्युनिअर कॉलेज शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट आहेत. या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी दिवा महाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून करण्यात आली. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले. या मार्गावर वाहतूक अधिक असते. रोडलगतच शाळा असल्याने मुलांना व पालकांना सुटीवेळी आणि शाळा सुटल्यानंतर वाहतुकीचा तसेच अपघात होण्याचा धोका आहे. यामुळे शाळेसमोर गतिरोधक असण्यासह शाळेपासून ५० मीटरच्या अंतरावर वाहने सावकाश चालवा, असे सूचना फलक लावण्याची मागणी चैतन्य गावडे सह.सचिव दिवा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जाहिरात

जाहिरात

जाहिरात
