Msrtc Recruitment : महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. 10वी पास तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर या ठिकाणी रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात समोर आली आहे. यामुळे, नोकरीच्या शोधात असलेल्या नवयुवकांसाठी ही एक आनंदाची पर्वणी राहणार असून लवकरात लवकर या पद भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे.
दरम्यान आज आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर या ठिकाणी किती पदांची भरती होणार आहे, कोणत्या पदांची भरती होणार आहे, अर्ज कसा करायचा, शैक्षणिक अहर्ता काय राहणार आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
किती आणि कोणत्या पदांसाठी होणार भरती
एमएसआरटीसी नागपूर या ठिकाणी
- मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) – 05 पदे
- मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder – 06 पदे
- वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician – 03 पदे
- वेल्डर (गॅस व इले.) / Welder – 09 पदे
- पेंटर (सामान्य) / Painter (General) – 02 पदे
- डिझेल मेकॅनिक / Diesel Mechanic – 12 पदे
- अशी एकूण 37 पदे भरली जाणार आहेत.
अर्ज करण्याची पद्धत कशी राहणार आहे
वर नमूद केलेल्या एकूण 37 पदांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.
मोटर वेहिकल मेकॅनिक या पदासाठी अर्ज करणे हेतू msrtc recruitment 2023 या लिंक वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
मोटर वेहिकल बॉडी बिल्डर या पदासाठी अर्ज करणे हेतू msrtc recruitment 2023 या लिंक वर जाऊन अर्ज करायचा आहे.