
ठाणे : निलेश घाग ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात यापूर्वीच आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार ४५ च्या आसपास आपला दवाखाना सुरु आहेत. त्यात मागील
काही महिन्यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून एका
ठिकाणी आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे.
त्यात आता ६७ दवाखान्यांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यातील २२ ठिकाणच्या जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात आता
आपला दवाखाना ही संकल्पना सुरु केली आहे. त्यानुसार
ठाण्यातही काही महिन्यांपूर्वी रामनगर भागात आपला
दवाखाना सुरु करण्यात आला आहे. दुपारी दोन ते रात्री १०
वाजेपर्यंत हा दवाखाना सुरु असतो. त्याला चांगला
प्रतिसाद मिळत आहे, त्यानुसार आता शहरातील सर्वच
भागात असे दवाखाने सुरु करण्यासाठी जागांचा शोध
महापालिकेकडून घेतला जात आहे. त्यात २२ जागा निश्चित
झाल्या आहेत. उर्वरीत ४६ जागांचा शोधही सुरु असल्याची
माहिती आरोग्य विभागाने दिली.
कुठे आहेत २२ जागा पहा सविस्तर
खिडकाळी, दातीवली, साबेगाव, सैनिक नगर, अमिनाबाद,
एमटीएमएल कंपाऊंड, संजय नगर, रामनगर, हाजुरी, गांधी
नगर, येऊर, बामनोई पाडा, कळवा, मानपाडा,
सावरकरनगर, वागळे इस्टेट, ढोकाळी, दिवा आदी ठिकाणे
निश्रित झाली आहेत.
जाहिरात

जाहिरात

