10 फेब्रुवारी रोजी मुंबई शिर्डी आणि मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस चा शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. दरम्यान या दोन्ही रेल्वेने प्रवास करण्यासाठी किती तिकीट लागेल याबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये मुंबई शिर्डी आणि मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस दरम्यान प्रवास करण्यासाठी किती तिकीट आकारले जाऊ शकते याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस तिकीट चे दर
हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवास करण्यासाठी चेअर कार साठी 900-1100 रुपये आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1900-2200 रुपये इतके शुल्क असण्याची शक्यता आहे. या शुल्कात प्रवाशांना आरामदायी प्रवाशासह नाश्ता, पाणी बॉटल देखील मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस तिकीट चे दर
हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करण्यासाठी चेअर कारसाठी 800 ते 1000 आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1600 ते 1800 रुपये दर असण्याची शक्यता आहे.