श्री. अभिजीत सप्रे, श्री. महेश राऊत, सौ. प्राजक्ता घडशी यांना मिळाली मोठी जबाबदारी.

जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | ऑक्टोबर ११, २०२३.
भारतीय जनता पार्टी संगमेश्वर (दक्षिण) तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष श्री. रूपेश कदम यांनी जाहीर केली. यामध्ये ग्रामपंचायत साडवलीचे सदस्य श्री. अभिजीत सप्रे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली असून श्री. महेश राऊत यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला प्रतिनिधी म्हणून सौ. प्राजक्ता घडशी यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव, मा. तालुकाध्यक्ष व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव आणि तालुकाध्यक्ष श्री. रूपेश कदम यांच्या मतानुसार ही निवड झाली आहे.
जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा समतोल राखत तसेच महिला-पुरुष समन्वय राखत करण्यात आलेल्या निवडीबद्दल जिल्हा सरचिटणीस सौ. जाधव यांनी तालुकाध्यक्षांचे अभिनंदन केले. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी जबाबदारीची जाणीव करून दिली. यावेळी त्या म्हणाल्या, “मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या प्रेरणेने, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्रजी चव्हाण यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाखाली, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर (दक्षिण) तालुका भाजपाची एक जबाबदार कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. आगामी निवडणुका व संघटना यांच्यासाठी समर्पित भावाने काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता ‘महाविजय २०२४’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी झोकून कामास लागावे. यावेळी लक्ष्य मोठे आहे त्यामुळे मेहनत करण्याशिवाय गत्यंतर नाही याचे भान ओळखून मिळालेल्या जबाबदारीचे निर्वाहन करावे.”