आंगणेवाडीतल्या भराडी देवीची आज यात्रा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीही यात्रेसाठी जाणार
भाविकांचे श्रद्धास्थान असलेलेभराडी देवीच्या यात्रा प्रसिद्ध असल्याने देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक आंगणेवाडीत दाखल होत असतात. नेते मंडळीही या यात्रेला हजेरी लावत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. या भराडी देवीच्या मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.
५ लाख भाविक येथे दाखल झाले असून पहाटे ३ वाजेपासून मंदिर दर्शनासाठी उघडले आहे. लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडीनगरी सजली असून ग्रामस्थ, मंडळे आणि प्रशासनाने चोख नियोजन केले आहे.यात्रेच्या पार्श्वभूमीवर महिनाभर आंगणे कुटुंबीय तयारीच्या कामात व्यस्त आहे. देवीच्या दर्शनासाठी रांगांची सुविधा केली आहे.